राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक महिला मंचच्यावतीने आज १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक महिला मंचच्यावतीने आज १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
वैष्णवी चौक महिला मंच च्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात
आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती वैष्णवी चौक महिला मंच च्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आले.
यावेळी सोनाली कदम,पूजा दोंड,दुर्गा वाळुंज,काव्या वाळुंज,योगिता पटारे,वैष्णवी धुमाळ, पूनम कुटे,मीना कदम यांनी आजच्या काळात ज्या प्रमाणे माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर संस्कार केले त्याप्रमाणे आजकालच्या सर्व मातांनी आपल्या मुलांवर संस्कार करणे गरजेचे असल्याचे सांगितले
कार्यक्रम प्रसंगी पुष्पा दोंड, रेखा बोरुडे,शीतल दोंड,मिना कुटे,मनीषा पोटे,उषा नेहे,लक्ष्मी कोल्हे,श्रावणी शिंदे,शोभा शिंदे,स्वाती कदम,शीतल पोटे,रुपाली कदम,वैशाली पटारे,सुरेखा खांदे,सरस्वती वाघ,आशा दोंड,मनस्वी कदम,सुरेखा विटनोर, पुष्पा कवाणे,पुष्पा कदम,सुलोचना कदम,भागीरथी राऊत,वंदना तुपे,वजरबाई भराडे व इतर महिला उपस्थित होत्या.
आभार सीमा लोंढे यांनी मांडले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैष्णवी चौक महिला मंच च्या सर्व महिला सदस्यांनी मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत