पानेगाव(वेबटीम) आयुष्याचा योग्य पटलावर घडण्यासाठी संस्कार रुपी सुत्राचा आवलंब करा असा मौलिक सल्ला सोनई पोलीस ठाण्याचे स.पो.नि. विजयकुमार म...
पानेगाव(वेबटीम)
आयुष्याचा योग्य पटलावर घडण्यासाठी संस्कार रुपी सुत्राचा आवलंब करा असा मौलिक सल्ला सोनई पोलीस ठाण्याचे स.पो.नि. विजयकुमार माळी यांनी पानेगांव (ता. नेवासे) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मुळा एज्युकेशन सोसायटीच्याचे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय सोनई राष्ट्रीय सेवा योजना आठवडाभर चालणाऱ्या राष्ट्रीय सेवा हिवाळी शिबिर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
आपल्या भाषणात सांगितले की,मी शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी म्हणून राहिलो. आजचा या सोशल नेटवर्किंगचा जमाना असून स्पर्धेचे युग म्हणून संबोधले जातं आहे.
त्यामुळे संस्कार, शिस्तप्रिय वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करून चांगलं काम महाविद्यालय कालखंडात प्रत्येकाने केले पाहिजे. निश्चितच प्रशासनातील अधिकारी, बरोबरच जनतेचा लोकप्रतिनिधी, जनसेवक, लोकशाहीचा नागरिक घडण्याची ताकत मिळेल असं यावेळी माळी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुळा कारखान्याचे संचालक संजय जंगले हे होते. प्राचार्य प्रा.डाॅ.शंकर लावरे, प्रा. डॉ. ज्ञानदेव झिने आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ बाळासाहेब खेडकर यांनी आठवडाभर चालणाऱ्या श्रम संस्कार कालावधीत श्रमदान स्वच्छता वृक्षारोपण आरोग्य जनजागृती नदी स्वच्छता प्लास्टिक मुक्त युवकांची अर्थिक साक्षरता पर्यटन रोजगार संधी लोकसंख्या नियंत्रण महिला सबलीकरण सायबर गुन्हेगारी विविध विषयांवर नामवंत अभ्यासक व्याख्यान देणार आहे.
कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच सौ.निकीता आंबेकर उपसरपंच दत्तात्रय घोलप ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, संदिप जंगले कचरु जंगले बाबासाहेब शेंडगे सुनिल चिंधे,डॉ विशाल फाटके, प्रा.राहुल निपुंगे, प्रा. विशाल पवार, प्रा. कावेरी पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचालन धनश्री दहातोंडे यांनी केले आभार डॉ तुकाराम जाधव यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत