जामखेड(प्रतिनिधी) जामखेड तालुक्यातील पिंपरखेड साईकृपा दूध संकलन शितकरण केंद्राने दूध उत्पादक शेतकऱ्याचे पॉलिसी काढल्यामुळे आज किसन येदू गुंज...
जामखेड(प्रतिनिधी)
जामखेड तालुक्यातील पिंपरखेड साईकृपा दूध संकलन शितकरण केंद्राने दूध उत्पादक शेतकऱ्याचे पॉलिसी काढल्यामुळे आज किसन येदू गुंजाळ यांना चेक स्वरूपात रक्कम देण्यात आली.व उपसभापती अंकुश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावली निमित्त दूध उत्पादक शेतकऱ्याच्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँक मध्ये पॉलिसी काढली होती. कै यशोदाबाई किसन गुंजाळ यांच्या गेल्या वर्षी मोटरसायकलवर एक्सीडेंट झाला होता. एक वर्षानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे मॅनेजर श्री आदिनाथ माळवदे यांच्या हस्ते श्री किसन येदु गुंजाळ यांना यावेळी दोन लाखाचा चेक देण्यात आला यावेळी साईकृपा दुध संकलन व शितकरण केंद्राचे चेअरमन श्री करण अंकुशराव ढवळे व भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर बँकेचे मॅनेजर श्री आदिनाथ माळवदे, श्री मोहोळकर सर, श्री बबन पाचारणे सर यावेळी उपस्थितीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत