कोपरगाव(वेबटीम) जगातील एकमेव मंदिर जेथे शुभ कार्यास मुहूर्त बघावा लागत नाही असे परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिर बेट कोपरगाव या ठ...
कोपरगाव(वेबटीम)
जगातील एकमेव मंदिर जेथे शुभ कार्यास मुहूर्त बघावा लागत नाही असे परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिर बेट कोपरगाव या ठिकाणी आहे. पंचक्रोशीतून नव्हे तर महाराष्ट्रातून तसेच भारतभरातून भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
त्या अनुषंगाने मंदिरामध्ये पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणे महत्त्वपूर्ण होते त्यामुळे मंदिराचे उपमंदीर प्रमुख श्री प्रसाद प-हे यांनी त्यांचे जेष्ठ चिरंजीव शुभम प-हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंदिराला एक कमर्शियल आरओ सप्रेम भेट दिला आहे.
यामुळे भक्तांची पिण्याच्या पाण्याची सोय उत्तमरीत्या होत आहे त्यांनी केलेल्या या मदतीचे सर्व ट्रस्टी व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत