श्रीरामपूर (प्रतिनिधी) राज्यातील अग्रगण्य असलेल्या शेतकरी संघटना उपाध्यक्ष स्व. बबनराव काळे यांचे जिल्ह्यासह राज्यभर जडणघडणीत मोठे योगदान आह...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
राज्यातील अग्रगण्य असलेल्या शेतकरी संघटना उपाध्यक्ष स्व. बबनराव काळे यांचे जिल्ह्यासह राज्यभर जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यांनी शेती, दुग्ध, वीज, साखर उद्योग धंद्यात सुसूत्रता यावी म्हणून अनेकदा जनआंदोलने यशस्वी केली आहे.त्यामुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर बहुकष्टकरी शेतकरी आणि शेती निगडीत शेत मजुरांचे असंख्य प्रश्नांची सोडवणूक झाली. अनेकांना शेती व्यवसायाची आणि दुग्ध व्यवसायाची आवड निर्माण व्हावी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. यामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्था टिकून राहण्यास पाठबळ मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना नेते स्व. बबनराव काळे यांचे कार्याचे पुनर्मूल्यांकन करून त्यांना मरणोत्तर पद्मभूषण द्यावे आणि श्रीरामपूर शहरात त्यांचे स्मारक व्हावे असे श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी प्रतिपादन केले आहे.
श्रीरामपूर येथे स्व. बबनराव काळे यांच्या दहाव्या पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम प्रसंगी सामाजिक भावनेतून राजेंद्र लांडगे बोलत होते.
याप्रसंगी स्व. बबनराव काळे यांचे अलौकिक कार्यांची यशोगाथा नवीन पिढीला माहिती होणं आवश्यक आहे. स्व. बबनराव काळे हे शेतीसह दुग्ध, वीज,साखर उद्योग, शेतकरी, शेतमजूर कामगारांचे गाढ अभ्यासक होते. अनेकांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केल्याने अनेकांचे कैवारी ठरले. याच पार्श्वभूमीवर सामाजिक भावनेतून स्व. बबनराव काळे यांचे कार्याचे पुनर्मूल्यांकन करून त्यांना मरणोत्तर पद्मभूषण देऊन श्रीरामपूर शहरात त्यांचे स्मारक व्हावे.यासाठी लोकसहभागातून पाठपुरावा देखील करू असे राजेंद्र लांडगे यांनी शेवटी म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे म्हणाले कि, शेतकऱ्यांचे कैवारी स्वर्गीय शरद जोशी यांच्या संघटनेत बबनराव काळे यांनी जिल्हाध्यक्ष पदावर काम केले. त्यावेळी त्यांची राज्य शासनाच्या ऊर्जा विभागावर वीज नियमक आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली होती. सदर पदावर काम करत असताना स्व. काळे साहेबांनी आयोगाचे सर्व नियमांचा अभ्यास करून शेतकरी विज बिल देणे लागत नसल्याचे सिद्ध केले. स्व.काळे साहेबांच्या या मांडणीमुळे राज्य शासनाला राज्यातील शेतकऱ्यांना वीज बिल मुक्ती द्यावी लागली. स्व. बबनराव काळे यांचे बरोबर काम करण्याची मिळालेली संधी हे माझे भाग्य असल्याचे समजतो. तसेच बावीस वर्षापूर्वी स्व.काळे साहेबांनी दोन रुपयात नादारीचे कर्जमाफी फॉर्म भरून घेतले. कर्ज माफिचे सर्व फॉर्म स्व.शरद जोशी साहेबांनी राष्ट्रपतींना दिले. परिणामी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारला कर्जमाफी योजना आमलात आणावा लागली. हे सर्व स्व. बबनराव काळे साहेबांमुळेच शक्य झालं असलेचं औताडे शेवटी म्हणाले आहे.
काळे कुटुंबियांचे सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान आहे. अनेक आठवणीला उजाळा दिला.
तालुकाध्यक्ष युवराज जगताप म्हणाले, स्व. बबनराव काळे यांनी विद्वत्तेतुन राज्यासह दिल्लीत देखील आपल्या कामाचा ठसा उमठवला. अनेक सामाजिक प्रश्नांची सोडवणूक केली. त्याचा असंख्य शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळाला आहे.
ॲड. सर्जेराव घोडे म्हणाले, संपूर्ण काळे कुटुंबियांचे सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान आहे. अनेक आठवणी उजाळा देत स्व. काळे यांचे जाण्याने मोठी हानी झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुदामराव औताडे म्हणाले स्व. काळे साहेबांनी समाजासाठी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांचे सारखे नेतृत्व पुन्हा होण्याची आवश्यकता आहे. डॉ.दादासाहेब आदिक अध्यक्ष पशुवैद्यकीय शेतकरी संघटना शरद आसने अध्यक्ष युवा आघाडी सोपानराव नाईक आदींनी मनोगत व्यक्त केले. स्व. बबनराव काळे यांचे निःस्वार्थ भावनेतून आणि प्रेरणतूनच आमच्या सारखे असंख्य कार्यकर्ते शेतकरी संघटनेत घडलो असलेचे अनेकांनी यावेळी भावना व्यक्त केल्या. यावेळी संदीप उघडे उपाध्यक्ष सागर गिऱ्हे ॲड. प्रशांत कापसे अभिजीत बोर्डे इंद्रभान चोरमल प्रदीप वारुळे इत्यादी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत