राहुरी पोलीस ठाण्यात उद्या शनिवारी तक्रार निवारण दिन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी पोलीस ठाण्यात उद्या शनिवारी तक्रार निवारण दिन

राहुरी(वेबटीम) राहुरी पोलीस ठाण्यात उद्या शनिवार १८ जानेवारी रोजी पोलिस ठाणे संबधित नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यात येणार असून नागरिकांनी...

राहुरी(वेबटीम)



राहुरी पोलीस ठाण्यात उद्या शनिवार १८ जानेवारी रोजी पोलिस ठाणे संबधित नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यात येणार असून नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले.


राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांच्या पोलीस विभागाशी असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नागरिकांच्या तक्रारी ऐकून तातडीने संबधित बिट अंमलदार अथवा तपासी अधिकारी यांच्या माध्यमातून निकाली काढणार आहे. उद्या शनिवारी सकाळी ११ ते २ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येणार असून नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी केले आहे.


राहुरी पोलिस ठाण्यात प्रथमच तक्रार निवार दिन

राहुरी पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी अर्थात १७ जानेवारी २०२४ रोजी राहुरी पोलीस ठाण्यात रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन अल्पवयीन मुलींना पालकांकडे स्वाधीन केले. चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी वाहन नंबर प्लेट तपासणी राबविण्यात आले. शेतकऱ्यांच्या मोटारी चोरी जाण्याच्या प्रकाराला आळा घालून शेतकऱ्यांना न्याय दिला. आज शुक्रवारी संजय ठेंगे यांनी राहुरीत १ वर्षाचा काळ यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.आणि उद्या प्रथमच तक्रार निवारण दिन आयोजित केल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत