राहुरी फॅक्टरी(वेबटीम) सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी महिलांसाठी मकर...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी महिलांसाठी मकर संक्रांति निमित्त हळदीकुंकू व वाण वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाप्रसंगी नर्मदा कृपांकित ह.भ.प.सीमाताई आहेर, श्रीक्षेत्र ताहराबादकर यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला.
महिलांनी चुल व मुल या चाकोरीत न राहता त्यांना एक व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान करत असलेल्या कार्याचा उल्लेख केला.
यावेळी देवळाली नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा ज्योती त्रिभुवन , माजी नगरसेविका सुजाता कदम, आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे ,माजी नगरसेविका नंदा बनकर,जिजामाता भजनी मंडळ, त्याचबरोबर राहुरी कारखाना कॉलनी, शेटेवाडी, देवळाली बंगला, आदिनाथ वसाहत,अंबिकानगर, सोमेश्वर वसाहत,गजानन वसाहत, वृंदावन कॉलनी, कराळेवाडी,वैष्णवी चौक,या परिसरातून शेकडो महिला उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थापक वसंत कदम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान व वैष्णवी चौक महिला मंच सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच सदस्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी वैष्णवी चौक महिला मंचच्या सदस्यांनी हळदी कुंकू व वाण वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेली सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत