पानेगांव (वार्ताहर) डॉ ऋषिकेश चंद्रकांत माकोणे एम. बी. बी. एस मेडीकलच्या शिक्षणासाठी रशिया बॅल्टीक फेडरल युनिव्हर्सिटी कॅलिलींग्राड येथे पु...
पानेगांव (वार्ताहर)
डॉ ऋषिकेश चंद्रकांत माकोणे एम. बी. बी. एस मेडीकलच्या शिक्षणासाठी रशिया बॅल्टीक फेडरल युनिव्हर्सिटी कॅलिलींग्राड येथे पुर्ण केले. त्याच बरोबर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा एफ. एम. जी. इ पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याबद्दल अंमळनेर (ता. नेवासा) येथे त्यांचा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने सभागृहात सत्कार आयोजित करण्यात आला त्यावेळी अंमळनेर ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर आयनर बोलतं होते. रशिया येथे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांच्याशी भारत -रशिया संबंधांवर वीस मिनिटाची चर्चा झाली त्यावेळी पुतीन यांनी ऋषिकेशचे कौतुक केले. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां मागे नाही.हे प्रत्येक विद्यार्थी तसेच पालकांनी बोध घेतला पाहिजे त्यासाठी स्पर्धा परीक्षा, नवनवीन तंत्रज्ञान, शिक्षणाचा वाटा निर्माण झाल्या आपोआप रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील निश्चितच जिवनात प्रगती झाल्या शिवाय राहणार नाही प्रचंड कष्ट घेवून नुसतं कुटुंबाचं गावाचं नाही तर मुळाथडी परीसराचं नांव ऋषिकेशने उज्ज्वल केले. असे गौरवोद्गार सरपंच आयनर यांनी काढले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब माकोणे, मुळा कारखान्याचे माजी संचालक कर्णासाहेब पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प) नेवासे तालुकाध्यक्ष अशोक मोरे, एकलव्य संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष नानासाहेब बर्डे, निंभारी चे पोलीस पाटील संतोष पवार, अंमळनेरचे पोलीस पाटील अनिल माकोणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अच्युतराव जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.
डॉ ऋषिकेश माकोणे यांचे ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, लोकनेते सुनीलभाऊ गडाख पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे आदींनी अभिनंदन केले.
यशामागे आई,वडिल कुटुंबातील सदस्यांची साथ गावा बरोबरच थोरा मोठ्याचं मार्गदर्शन जिद्द, चिकाटी, ध्येय यश संपादीत झाले निश्चितच गावाचं मुळाथडी परीसराचं नांव आणखी उज्ज्वल करेलचं जनसेवेचा माध्यमातून कार्य करत राहिलं - डॉ. ऋषिकेश माकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत