पानेगांव (वार्ताहर) मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत व...
पानेगांव (वार्ताहर)
मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी बेलापूर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी प्रमुख अतिथी म्हणून मनोगतामध्ये आई-वडिलांसारखे या जगात दुसरे दैवत नाही, आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे प्रतिपादन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ जानेवारी २०२५ ते २१ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन पानेगाव (ता. नेवासे) या ठिकाणी करण्यात आले होते. आज झालेल्या समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पानेगावचे उपसरपंच दत्तात्रय घोलप आणि मुळा कारखान्याचे संचालक संजय जंगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी गावा विषयी केलेल्या भरीव कामाचा उल्लेख केला. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे सर आणि उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रमाधिकारी डॉ. बाळासाहेब खेडकर यांनी सात दिवसांमध्ये विद्यार्थ्याने या शिबिरामध्ये केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुंदे गीतांजली आणि बानकर भक्ती या दोन विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन ब्राह्मणे अक्षय यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. संभाजी दराडे, डॉ. जगदीश सोनवणे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख अविनाशजी साळवे, डॉ.उमेश कांबळे, प्रा. महेश जंगले,डॉ. तुकाराम जाधव, प्रा. विशाल फाटके, प्रा.विवेक वने, प्राध्यापिका कावेरी ढोकणे, प्राध्यापिका कल्याणी गाडेकर, सोपान दरंदले,हितेश जंगले, संकेत गुडधे समवेत पानेगाव या गावातील ग्रामस्थ मंडळी आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व १२५ स्वयंसेवक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत