श्रीरामपूर जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित अहिल्यानगर जिल्हास्तरीत महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत श्रीरामपूरचे महसूल सेवक गणेश बिरदवडे यांन...
श्रीरामपूर
जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित अहिल्यानगर जिल्हास्तरीत महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत श्रीरामपूरचे महसूल सेवक गणेश बिरदवडे यांनी बुद्धिबळ क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. कोपरगाव येथील आत्मा मलिक क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते गणेश बिरदवडे यांना पुष्पगुछ, सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या विजयाने बिरदवडे यांची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गणेश बिरदवडे यांचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, शिरस्तेदार वनिता कल्हापुरे, संजय गांधी योजना नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, निवडणूक नायब तहसीलदार हेमलता वाकडे, महसूल नायब तहसीलदार बी. बी. गोसावी, मंडळ अधिकारी भीमराज मंडलिक, रेव्हेन्यू सोसायटीचे उपाध्यक्ष राजेश घोरपडे यांसह श्रीरामपूर महसूल सेवक संघटना, सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत