प्रेरणा मल्टीस्टेटची मावळ तालुक्यातील बेबड ओहोळ येथे शाखा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रेरणा मल्टीस्टेटची मावळ तालुक्यातील बेबड ओहोळ येथे शाखा

  वडगाव मावळ(प्रतिनिधी) सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन सदस्यांनी आपल्या गरजू सदस्यांची पत वाढवण्यासाठी विशेष उपक्रम हाती घ्यावेत असे प्रतिपाद...

 वडगाव मावळ(प्रतिनिधी)



सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन सदस्यांनी आपल्या गरजू सदस्यांची पत वाढवण्यासाठी विशेष उपक्रम हाती घ्यावेत असे प्रतिपादन मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी बेबड ओहोळ येथे केले.


प्रेरणा मल्टीस्टेट अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या मावळ तालुक्यातील बेबड ओहोळ या  शाखेतील लॉकर सुविधेचे उद्घाटन करताना आमदार बोलत होते. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, सहकार महर्षी माऊली दाभाडे उपस्थित होते. तर यावेळी माजी आमदार विलास लांडे, संस्थेचे संस्थापक सुरेश वाबळे,मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती एकनाथ टिळे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अशोकराव शेलार,उद्योजक शशिकांत हळदे,सरपंच तेजल घारे, पोलीस पाटील दुर्गा घारे,संस्थेचे चेअरमन सुजित वाबळे,व्हा चेअरमन वेणुनाथ लांबे,संचालक दादासाहेब उर्हे, विष्णुपंत वर्पे, सल्लागार मनोज ढमाले,दिलीप देशमुख,धनंजय घारे,मंगेश घारे, रणजीत घारे आदी मान्यवर उपस्थित होते. 


आमदार शेळके पुढे बोलताना म्हणाले की पतसंस्था काढणे सोपे आहे; मात्र ती टिकविणे व तिची विश्वासार्हता वाढविणे हे अवघड काम आहे तसेच राजकारण आणि सहकार क्षेत्र ही दोन्ही विभक्त असावीत असेही आमदार शेळके यांनी यावेळी सांगितले.


माजी आमदार विलास लांडे, माऊली दाभाडे यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थापक सुरेश वाबळे यांनी केले तर स्वागत संचालक दादासाहेब उर्हे यांनी केले. सूत्रसंचालन संचालिका सुरेखा लवांडे यांनी केले तर प्रा. विशाल वाबळे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत