राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान संचालिका पल्लवी प्रकाश सोनी यांचे आज २७ जानेवारी रोजी सकाळी पुणे खासग...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान संचालिका पल्लवी प्रकाश सोनी यांचे आज २७ जानेवारी रोजी सकाळी पुणे खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्यावर आज दुपारी ३.०० वाजेच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर भागातील अमरधामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
पल्लवी सोनी यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी 3 वाजता त्यांच्यावर प्रसादनगर येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या प्रकाश सोनी यांच्या पत्नी होत. त्यांचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत