जामखेड(वेबटीम) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा झाला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली...
जामखेड(वेबटीम)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा झाला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली, देशभक्तीपर घोषणा दिल्या. तसेच ग्रामपंचायत कार्यालय बावी येथे गावचे सरपंच , उपसरपंच, व ग्रामसेवक,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आणि बावी विविध सेवा सोसायटी कार्यालय येथे सोसायटीचे चेअरमन व सचिव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक अमोल पंढरीनाथ पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ध्वजारोहण पार पडले.
त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तीपर सांस्कृतिक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरण करण्यात आले. लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना सदर संस्कृतिक कार्यक्रम केल्याबद्दल ग्रामस्थांनी बक्षीस दिले. व लोकसहभागाच्या माध्यमातून बक्षीस रुपी 21400 रुपये रोख रक्कम जमा झाली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपाध्यापक श्री योगेश भगवान तुपविहिरे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री अमोल पंढरीनाथ पवार यांनी केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती तसेच लोकसहभाग, शिक्षक सहभाग, शासकीय निधी, व ग्रामपंचायत निधीच्या माध्यमातून शाळेतील भौतिक सुविधा व डिजिटल शैक्षणिक साधने उपलब्ध झाल्याबद्दल सरपंच व उपसरपंच सर्व सदस्य व कर्मचारी ग्रामपंचायत बावी तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी यांचे जाहीर आभार मानण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गावचे सेवानिवृत्त शिक्षक श्री जगन्नाथ पवार सर लाभले तसेच सदर कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच सौ. प्रियंका गणेश पवार व उपसरपंच दादासाहेब मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य निलेश पवार, महादेव कारंडे ग्रामसेवक श्री तांबोळी साहेब, शिक्षण प्रेमी श्री बलभीम मुरुमकर सर, राम पवार, हनुमंत निकम महाराज, अमृत कारंडे, दादासाहेब वामन पवार, प्रताप रंधवे सुभाष कारंडे अंगणवाडी सेविका विमल पवार, मधुमती रंधवे, आशा सेविका सुलभा शिंदे व सर्व ग्रामस्थ मोठ्या उपस्थितीत होते. माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन अभियानात तालुका स्तरावर क्रमांक दोन क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदरणीय बलभीमकर सर यांनी पेन व पुस्तके भेट देऊन शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान केला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेची पदवीधर उपाध्यापक श्री विशाल सुधाकर जंगले व उपाध्यापिका श्रीमती रुबीना जाफरखान पठाण यांनी बरेच परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. सदर कार्यक्रमासाठी साऊंड व माईक सिस्टीम सचिन अर्जुन चिकणे यांनी उपलब्ध करून दिले. शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल पंढरीनाथ पवार यांनी उपस्थित आमचे आभार मानले. व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत