राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कणगरचे सरपंच सर्जेराव घाडगे यांच्या संकल्पनेतून गेली 3 वर्ष कनगर येथील ग्रामपंचायतची १०० टक्के पाणीपट्टी व...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील कणगरचे सरपंच सर्जेराव घाडगे यांच्या संकल्पनेतून गेली 3 वर्ष कनगर येथील ग्रामपंचायतची १०० टक्के पाणीपट्टी व घरपट्टी भरणाऱ्या कुटुंबाची निवड लकी ड्रॉ काढून काढून सदर दाम्पत्याच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. आज २६ जानेवारी रोजी अशोक भागवत नालकर व त्यांच्या पत्नी पुजाताई अशोक नालकर यांची लकी ड्रॉ पध्दतीने चिठ्ठी निघाली असुन त्यांना बहुमान मिळाला आहे.
यावेळी कणगर ग्रामपंचायत कडून नालकर दाम्पत्यास फेटा बांधून व साडीचोळी देउन त्यांचा सन्मान सरपंच सर्जेराव घाडगे व सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. अशोक व पुजा नालकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण पार पडले.
यावेळी उपसरपंच बाळासाहेब गाढे, संदीप घाडगे, दादासाहेब घाडगे, सुभाष नालकर, दत्तात्रय गाढे, महमदभाई इनामदार, केशव गोरे, बाळासाहेब मुस माडेअन्सार शेख मगर सर सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, ग्रामस्थ बंधू भगिनी, न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक मुसळे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळसे सर ,मेहेत्रे सर, दोन्ही शाळांचे विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस ,आशा सेविका उपस्थित होते.ग्रामपंचायतच्या सर्व विद्यार्थी व उपस्थित लोकांना गोड जेवण देऊन समारोप करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत