जामखेड(अमृत कारंडे) कर्जत जामखेड युवा पत्रकार संघ अध्यक्षपदी कर्जत येथील सुनील खामगळ उपाध्यक्षपदी कर्जत येथील विशाल कोपनर सचिव पदी जामखेड ये...
जामखेड(अमृत कारंडे)
कर्जत जामखेड युवा पत्रकार संघ अध्यक्षपदी कर्जत येथील सुनील खामगळ उपाध्यक्षपदी कर्जत येथील विशाल कोपनर सचिव पदी जामखेड येथील अमृत कारंडे. खजिनदार पदी धनंजय खराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कर्जत जामखेड युवा पत्रकार संघाचे पत्रकार सुनील घोलांटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीत यावर्षीपासून कर्जत जामखेड शहर,ग्रामीण भागात सर्व पत्रकारांनी लेखणीतून दुर्लभ , वंचित घटकांना न्याय देणार असल्याचे सांगितले. सामाजिक काम करून सर्वसामान्यांच्या प्रश्न नांना वाचा फोडण्याचे काम करण्याचे यावेळी बैठकीत ठरले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत