देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा बाजारतळ येथे उद्या रविवार दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत श्री ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा बाजारतळ येथे उद्या रविवार दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत श्री साई उत्सव २०२५ या निमित्ताने श्री साई प्रतिष्ठान व देवळाली प्रवरा शहरवासीय आणि डॉ.माने मेडिकल फाउंडेशन संचलित साईधाम हॉस्पिटल, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत स्त्रीरोग वंध्यत्व निदान,व स्त्रीरोग,कॅन्सर जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये मोफत तपासणी, मोफत औषधे मोफत सोनोग्राफी, मोफत गर्भमुखाच्या कॅन्सरची तपासणी,स्त्रीयांच्या हाडांचे विकार पाठ दुखने,गुडघे दुखणे,पाठ दुखने यावर तपासणी करून औषधे मोफत दिली जाणार आहे.
तरी या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत