राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत येथे ३१ जानेवारीपासून गणेश जयंती निमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सव मंडप कामाचा शुभारंभ व ध्वजारोहण संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत येथे ३१ जानेवारीपासून गणेश जयंती निमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सव मंडप कामाचा शुभारंभ व ध्वजारोहण संपन्न

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत येथे श्री पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने गणेश जयंती निमित्ताने येत्या ३१ जानेवार...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत येथे श्री पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने गणेश जयंती निमित्ताने येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत पार पाडणाऱ्या त्रिदीनी कीर्तन महोत्सवाच्या मंडप कामाचा शुभारंभ व ध्वजारोहण आज सायंकाळी सहा वाजता साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

गुरुकुल वसाहत येथे येत्या ३१ जानेवारीपासून त्रिदेवी कीर्तन महोत्सवास प्रारंभ होणार असून आज मंडप कामाचा शुभारंभ व ध्वजारोहण संपन्न झाला आहे.

त्रिदिनी कीर्तन महोत्सवात प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने प्रवचने व रोज सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन श्री पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी पावन गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब पगारे,उपाध्यक्ष अरुण गायकवाड,गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गोपाल शिंदे, दि राहुरी अर्बन मल्टिनिधीचे चेअरमन रामभाऊ काळे, धनलक्ष्मी उद्योग समूहाचे अध्यक्ष विष्णुपंत गीते,किशोर थोरात, पत्रकार श्रीकांत जाधव, डॉ.विलास पाटील, गायनाचार्य संपत काका जाधव,त्रिमूर्ती क्रेनचे यमनाजी आघाव,ह.भ.प बाळकृष्ण महाराज खांदे,अरुण कराड,विलास अल्हाडे, नंदकिशोर काळाने,श्री. पेरणे, राजेंद्र सोनटक्के ,पंकज ढुमने, रवी पवार, कुणाल तनपुरे,भारत खांदे, मनोहर निघूते, मनोज अल्हाडे,मारुती भगत आदींसह परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत