राहुरी(प्रतिनिधी) राहुरीत तालुक्यातील आरडगाव येथील तक्षज्ञ जुनियर काॅलेज येथे उद्या बुधवार २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता "आई-बाप ...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरीत तालुक्यातील आरडगाव येथील तक्षज्ञ जुनियर काॅलेज येथे उद्या बुधवार २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता "आई-बाप समजुन घेतना" या प्रसिद्ध कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रील प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे हृदयस्पर्शी व्याख्यान संपन्न होणार आहे.
आहिल्यानगर जिल्हातील राहुरी तालुक्यात प्रथमच हंकारे यांचे व्याख्यान होणार असल्याने या कार्यक्रमास मोठा देखील प्रतिसाद लाभणार आहे. प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व वेेदांत फाऊंडेशन व तक्षज्ञ काॅलेज संस्थापक अध्यक्ष बाबासाहे मुसमाडे हे असणार आहे.
सध्या सर्वञच अल्पवयीन मुली बरोबरच कॉलेज युवक-युवती पळून जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पालकांचा विचार न करता अनेक मुली घर सोडून घरच्यांच्या संमतीशिवाय प्रेम विवाह करतात अनेक ठिकाणी मुलींना फसवण्याचे प्रकार देखील यातून समोर आले आहे. अशा घटनांमुळे मुलींचे आयुष्य उध्वस्त होत असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे. त्याचबरोबर आई-वडीलांची समाजात बदनामी होऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. त्यातूनच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक प्रकारचे गुन्हे देखील घडत आहेत. त्यामुळे मुला-मुलिंना योग्य वयात योग्य संस्कार अन् मार्गदर्शन मिळावे या हेतूने या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. त्यामुळे या व्याख्यानास कॉलेज युवक-युवती तसेच पालकांनी देखील उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य जगदीश मुसमाडे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत