देवळाली प्रवरा सोसायटीचा अनागोंदी कारभार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा सोसायटीचा अनागोंदी कारभार

देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा सोसायटीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून सभासद शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत राजमुद्रा प्...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा सोसायटीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून सभासद शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत राजमुद्रा प्रतिष्ठाचे अध्यक्ष प्रशांत शिवाजीराव मुसमाडे यांनी सहायक निबंधकांकडे लेखी तक्रार केली असून याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.


याबाबत प्रशांत मुसमाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले की, १२ जानेवारी रोजी देवळाली सोसायटी संस्थेमध्ये युरिया खत उपलब्ध झाले होते आणि १८ जानेवारी रोजी शिल्लक असताना ही संपल्याचे जाहीर करण्यात आले. सभासदांना आधारकार्डवर प्रत्येकी फक्त १ बॅग युरिया वाटप करण्यात आले काही सभासदना युरिया संपली सांगून  बाहेरील दुकानदारांना खताच्या बॅगा विकल्याचा संशय असल्याचे मुसमाडे यांनी सांगून चेअरमनच्या मर्जीतील सभासद व संचालकांना १ पेक्षा अधिक बॅगा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

मागील वर्षी रासायनिक खतांच्या किमती वाढल्यानंतर जुन्या किमतीचे खत संस्थेकडे उपलब्ध असतानाही  स्टॉक संपल्याचे जाहीर करून त्याच खताला नवीन किंमतीत विकण्यात आले आहे. जुन्या व नवीन किंमतीत मोठा फरक असून यामुळे आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मुसमाडे यांनी केला आहे.



देवळाली सोसायटी संस्थेच्या खत डेपो विभागामध्ये शेतकऱ्यांना युरियाची गोणी घ्यायची असल्यास डीएपी लिक्विडची सक्ती करण्यात आली आहे. २६६ रुपयांच्या युरिया गोणी वर ६०० रुपयाची लिक्विड डीएपी घेणे सक्तीचे केले असून सभासद शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे.


महाराष्ट्र सहकारी सोसायटी अधिनियमा नुसार खत विभागाचे कागदपत्रे मागितली असता तरी ही ते देण्यास चेअरमन यांनी मज्ज्व केल्याचे व्यवस्थापकाने सांगितले  व माहिती देणे नाकारले आहे आणि माहिती लपवण्याचा प्रयत्न केला असून व्यवस्थापन आणि चेअरमनवर महाराष्ट्र सहकारी सोसायटी अधिनियमाच्या कलम ७३(१), ७८नुसार कारवाई होऊन  संस्थेच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यात यावी. तसेच सदर संस्थेमध्ये सभादांवर अन्याय होत असून इतरही विभागामध्ये गैरकारभार सुरु आहे संस्थेतील सर्व कारभार पारदर्शी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत आणि सभासदांच्या हिताचे रक्षण  करावे अशी मागणी प्रशांत मुसमाडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत