श्रीरामपूर(वेबटीम) येथील पालिकेच्या पीएम श्री नगरपालिका शाळा क्र. ७ पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...
श्रीरामपूर(वेबटीम)
येथील पालिकेच्या पीएम श्री नगरपालिका शाळा क्र. ७ पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी होते. तसेच रमेश कोठारी, मधुकर माळवे, करण नवले, रवी भागवत, मधुकर दिघे, प्रदीप आहेर, सलीम पठाण, विशाल वर्धावे, संदीप पाळंदे, नितीन चित्ते, ॲड. कैलास आगे, श्री. सगळगिळे, महेश रक्ताटे, सचिन उघडे, श्री. बनकर आदी पत्रकारांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी श्रीरामपूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजीवन दिवे यांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा सन्मान सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पद्माकर शिंपी, रवी भागवत, करण नवले, ॲड. कैलास आगे, सलीम पठाण आदींनी विद्यार्थांना पत्रकारिता क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले. प्रशासनाधिकारी संजीवन दिवे यांनी संबोधित करताना शाळेविषयीच्या संकल्पना व विद्यार्थी हिताच्या नव योजनांचा आढावा दिला. तसेच शाळेच्या शिक्षकांनी पीएम श्री अंतर्गत शाळेत केलेल्या वेगवेगळ्या भौतिक सुविधांची माहिती दिली. त्यामध्ये शाळेची रंगरंगोटी, परसबाग, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या सर्व फळभाज्या व पालेभाज्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या मध्यान भोजनामध्ये करण्यात येत आहे. विद्यार्थी उपयोगी दर्जेदार शैक्षणिक साधने, नवीन बेंचेस, वृक्षरोपणाने झालेली ग्रीन स्कूल, वर्गात इंटरऍक्टिव्ह बोर्ड, एल. एफ. डी. बसविल्याने शाळा शंभर टक्के डिजिटल झाली आहे. तसेच यावर्षी शाळेला कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब व सुसज्ज वाचनालय पीएम श्री अंतर्गत मिळणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिक्षण मंडळाचे किशोर त्रिभुवन, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीम. मोरगे, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना जगताप, अल्ताफ शाह व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक प्रशांत पठाडे, सूत्रसंचालन अजय धाकतोडे तर आभार वर्षा वाकचौरे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत