धनादेश न वटल्याने साई आदर्श मल्टीस्टेटच्या कर्जदाराला शिक्षा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धनादेश न वटल्याने साई आदर्श मल्टीस्टेटच्या कर्जदाराला शिक्षा

राहुरी(वेबटीम) राहुरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या शाखेतून  मल्हारवाडी येथील अनिल अशोक जाधव यांनी कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफ...

राहुरी(वेबटीम)



राहुरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या शाखेतून  मल्हारवाडी येथील अनिल अशोक जाधव यांनी कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड ठरल्याप्रमाणे वेळेत केली नाही. थकबाकी झाली तेव्हा संस्थेचे कर्मचारी वसुलीसाठी गेले असता आरोपी अनिल अशोक जाधव यांनी स्वतःच्या खात्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बारागाव नांदूर तालुका राहुरी या बँकेचा धनादेश नंबर ००६८०६  रक्कम रुपये  ६७००० चा धनादेश  देऊन वटण्याची हमी  व भरोसा दिला व कर्जापोटी रक्कम घेऊन जाण्यास सांगितले. परंतु सदर चा धनादेश वटला नाही म्हणून फिर्यादी साई आदर्श संस्थेच्या वतीने अहिल्यानगर येथील न्यायालयात नि.इ. अॅक्ट 138 नुसार फौजदारी दाखल केली. सदरची फिर्याद मे  न्यायालयात गुणदोषावर सुनावणी झाली



 सदर सुनावणीच्या वेळी साई आदर्श संस्थेच्या वतीने किरण रसाळ यांची साक्ष नोंदवण्यात आली व त्यावेळी साई आदर्श संस्थेच्या वतीने आवश्यक ती योग्य कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली. फिर्यादी संस्थेचे रसाळ यांची साक्ष; दाखल केलेली कागदपत्रे व आलेला पुरावा ग्राह्य म्हणून आरोपी अनिल अशोक जाधव यांस ८५००० /- (पंच्यांऐंशी हजार रुपये) नुकसान भरपाई व ती न भरल्यास एक महिना शिक्षा असा आदेश केलेला आहे. सदरची रक्कम निकाल दिनांक पासून 30 दिवसाच्या आत भरण्या  बाबत  आदेश झालेला आहे. 

सदरचा निकाल अहिल्यानगर येथील दिवाणी फौजदारी मा.न्यायमूर्ती  एच.आर.जाधव यांनी दिला आहे. फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने  न्यायालयात फिर्यादी तर्फे अॅड.अक्षय दिलीप शेळके  यांनी काम पाहिले व त्यांना साह्य अॅड.दिलीप एस शेळके पा. , अॅड. प्रिया काळे यांनी साह्य  केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत