चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ जानेवारीला विविध सामाजिक उपक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ जानेवारीला विविध सामाजिक उपक्रम

राहूरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथील सामाजिक,धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांचा अभिष्...

राहूरी फॅक्टरी/वेबटीम:-

देवळाली प्रवरा येथील सामाजिक,धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांचा अभिष्टचिंतन सोहळा ३१ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होत असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


 गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी सायं.७ वा.संत गाडगेबाबा आश्रम शाळा वरवंडी या ठिकाणी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व अन्नदान त्याच बरोबर शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता चव्हाण वस्ती देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप त्याचबरोबर सायंकाळी ६ ते ७ या वेळेत राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा व सायंकाळी ८ वाजता गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयात आश्रमातील बाल गोपाळांच्या सानिध्यात अभिष्टचिंतन सोहळा साजरा करून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.


तरी मित्रपरिवार हितचिंतक आप्तेष्ट यांनी उपस्थित रहावे असे आवाहन गणेश दादा भांड मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत