राहुरी(वेबटीम) नुकत्याच राहुरी येथे राहूरीत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या सेवेकरांच्या माध्यमातून राष्ट्रीय सत्संग सोहळा संपन्न झाला.तोच...
राहुरी(वेबटीम)
नुकत्याच राहुरी येथे राहूरीत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या सेवेकरांच्या माध्यमातून राष्ट्रीय सत्संग सोहळा संपन्न झाला.तोच यादरम्यान डॉ. विजय मकासरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट अज्ञात इसमाने वायरल करून मकासरे यांची व गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे बदनामीकारक मजकूर टाकल्याने जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात असलेल्या गुरुमाऊली सेवेकरी यांच्यामध्ये मोठी संतापाची लाट पसरली असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत विजय मकासरे यांच्याशी संपर्क साधला असता सायबर सेलमध्ये संबंधित अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे
सामाजिक कार्यकर्त्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी नुकत्याच परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन अतिशय बदनामीकारक आरोप केल्याचे सेवेकरी यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्या विरोधात डॉ. विजय मकासरे यांनी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या समर्थनार्थ आवाज उठवून सेवेकरांना एकत्र करण्याचे काम सुरू केले होते.
व गुरुमाऊलीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहुन लढण्याचे ठरवले होते. तृप्ती देसाई यांनी परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्यावर महिलांचे शोषणाचा आरोप केला होता.
महिना उलटूनही तृप्ती देसाईंनी याबाबत कुठलेही पुरावे न देता गुन्हा दाखल केले नाही, म्हणून त्यांच्या आरोपांबाबत शंका व्यक्त केली जात असताना विजय मकासरे यांनी श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन उभारण्याचे ठरवले होते.
अशातच डॉ मकासरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर गुन्हा दाखल झाल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करून गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व विजय मकासरे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र हिंदू विरोधी संघटनांनी सुरू केले आहे.
याबाबत विजय मकासरे लवकरच कायदेशीर गुन्हा दाखल करणार असुन वेळप्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत