शंकर मामा साबळे यांच्या निधनाने शोककळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शंकर मामा साबळे यांच्या निधनाने शोककळा

 जामखेड जामखेड तालुक्यातील नान्नज येथील शंकर मामा साबळे यांच्या निधनाने सर्व सामान्यांची माया हरपली त्यांच्या मृत्यूने नान्नज परिसरात शोककळा...

 जामखेड



जामखेड तालुक्यातील नान्नज येथील शंकर मामा साबळे यांच्या निधनाने सर्व सामान्यांची माया हरपली त्यांच्या मृत्यूने नान्नज परिसरात शोककळा..

 सर्वांचे आदरणीय शंकर मामा साबळे यांच्या निधनाने जामखेड तालुक्यातील नान्नज या गावांमध्ये दुःखद वार्ता. हे अहिल्या नगर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब निवृत्ती पवार पाटील यांचे विश्वासू सेवक म्हणून ओळख असणारे नान्नज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे सलग 25 वर्ष धान्य वाटप सेवक म्हणून अल्पषा वेतना मध्ये काम करून सर्वसामान्य गोरगरिबांची सेवा करत सतत एकनिष्ठ राहून समाज स्तरावरील सर्व जाती-धर्माच्या लोकांशी आपली व आपल्या कुटुंबाची नाळ जुळवलेले सर्व परिचित असे व्यक्तिमत्व स्वर्गीय शंकर बाबुराव साबळे वय 89 यांची अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी दिनांक 27 जानेवारी पहाटे 2 वाजता दुखत निधन झाले. त्यांच्यावर नानाजी येथील गुरेवाडी रोड वरील स्मशान भूमी सर्व मित्रपरिवार व कुटुंबियांच्या यांच्या उपस्थित शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर त्यांच्या मागे पत्नी सोजर बाई मुलगा विजय साबळे सुन माया साबळे नातु वैभव साबळे, सार्थक साबळे नातसुन सानिका साबळे  असा परिवार असून त्यांच्या जाण्याने सर्वांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. 

समाजाच्या मनातील मायेचा माणूस खराबला असल्याची प्रतिक्रिया जनसामान्य करत आहे. 

   त्यांचा दशक्रिया विधी मानवत तालुका जामखेड येथील गुरेवाडी रोड स्मशानभूमी जवळील नदीपात्रात दिनांक 5/2/2025 रोज सकाळी ठीक 10 वाजता होणार आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत