श्रीरामपूर(वेबटीम) देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि. ३०) सकाळी ११...
श्रीरामपूर(वेबटीम)
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि. ३०) सकाळी ११.०० वाजता श्रीरामपूर तहसीलदारांच्या दालनात दोन मिनिटे मौन (स्थब्धता) पाळून आदरांजली वाहण्यात आली. देशभर ३० जानेवारी हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येत असून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे यामधील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळावे असे शासनाने परिपत्रक काढले आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर तहसीलदार कार्यालयात दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मौन पाळत हुतात्म्यांना आदरांजली वाहत असताना सर्व स्तब्ध झाले होते.
यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, निवासी नायब तहसीलदार, राजेंद्र वाकचौरे, महसूल नायब तहसीलदार बाबासाहेब गोसावी, सं.गा.यो. नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, पुरवठा निरीक्षक अधिकारी राजेंद्र शिंदे यांसह तहसीलदार कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत