राहुरी फॅक्टरी(वेबटीम) मागील 33 वर्षापासून वैष्णवी चौक युवा युवा प्रतिष्ठानच्या वतीने वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी कटरा (जम्मू) येथे दरवर्ष...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
मागील 33 वर्षापासून वैष्णवी चौक युवा युवा प्रतिष्ठानच्या वतीने वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी कटरा (जम्मू) येथे दरवर्षी शेकडो भाविक जात असतात यावर्षी या यात्रेचे 34 वे वर्ष असून काल वैष्णवी चौक येथून भाविक दर्शनासाठी रवाना झाले.
या यात्रेत अमृतसर येथील सुवर्णमंदिर,वाघा बॉर्डर, पटनी टॉप,शिवखुरी व त्यांनतर वैष्णवी देवीचे दर्शन घेऊन ही यात्रा 7 फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे.
यावेळी वैष्णवी देवी यात्रेस भाजप शहराध्यक्ष वसंत कदम,मनसे तालुकाप्रमुख अनिल डोळस, सुधाकर आदिक,सुनील जाधव,दादासाहेब वाणी,दीपक माळी, बापूसाहेब काळे,प्रशांत लोळगे,अमोल वाळुंज,बाळासाहेब वाळुंज,पियुष झवर,महेंद्र दोंड,रमेश कुर्हे,रामदास वाणी,किरण उघडे,दीपक शिरसाठ,ओंकार कोबरणे,दत्तात्रय हारदे,नितीन सुडके,रामदास वाबळे इत्यादी भाविक दर्शनासाठी रवाना झाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत