राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत येथे उद्या ३१ जानेवारीपासून त्रिदिनी कीर्तन महोत्सव हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत येथे उद्या ३१ जानेवारीपासून त्रिदिनी कीर्तन महोत्सव हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन

राहूरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहतमधील श्री. पावन गणपती प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेश जयंती निमित्ताने त्रिदिनी कीर्...

राहूरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहतमधील श्री. पावन गणपती प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेश जयंती निमित्ताने त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उद्या शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी ते रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत हा कीर्तन महोत्सव सुरू राहणार आहे.

या कीर्तन महोत्सवात शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सायं. ५ ते ६ या वेळेत ह.भ.प वैष्णवी ताई महाराज नरोडे यांचे प्रवचन त्याचबरोबर सायं.७ ते ९ या वेळेत ह.भ.प श्रीकांतजी महाराज गागरे यांचे कीर्तन तर शनिवार दि.१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ह.भ.प बाबा महाराज मोरे यांचे प्रवचन तर सायं. ७ ते ९ या वेळेत महंत ह.भ.प अर्जुन महाराज तनपुरे यांचे जाहीर हरिकीर्तन व रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी सायं. ५ ते ७ या वेळेत ह.भ.प बाळकृष्ण महाराज खांदे यांचे प्रवचन तर सायं.७ ते ९ या वेळेत विनोदाचार्य ह.भ.प पांडुरंग गिरी महाराज वावीकर यांचे काल्याचे किर्तन व त्यांनतर महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार आहे.


 तरी या कीर्तन महोत्सवात परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पावन गणपती प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत