देवळाली प्रवरा(वेबटीम) तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांचा प्रशासनातील उत्तम कारभाराशिवाय सामाजिक, सांस्कृ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांचा प्रशासनातील उत्तम कारभाराशिवाय सामाजिक, सांस्कृतिक , साहित्य क्षेत्रातीची आवड व अभ्यासही वाखडण्याजोगा असून उद्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व त्र्यंबकेश्वर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात व्याख्यानासाठी आमंत्रित केले आहे.
राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्याथी कल्याण अधिकारी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, पदव्युत्तर महाविद्यालय तसेच डॉ. अण्णासाहेच शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ फेब्रुवारी, २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती (शिवजयंती) निमित्ताने डॉ. नानासाहेब पवार सभागृह, मफुकृवि, राहुरी येथे मुख्याधिकारी विकास नवाळे यांचे सकाळी १० वाजता शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील मराठा प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रमुख अतिथी वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत