राहुरी/वेबटीम:- राहुरी पोलीस ठाणे हद्दीमधील विना नंबर प्लेट धारकांच्या दुचाकी पकडण्याच्या कामाचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे जबरदस्त कार...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी पोलीस ठाणे हद्दीमधील विना नंबर प्लेट धारकांच्या दुचाकी पकडण्याच्या कामाचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे जबरदस्त कारवाईचे सत्र सुरूच ठेवले असून सन २०२४ मध्ये राहुरी पोलिसांनी ट्रॅफिक उल्लंघनाच्या १७०६ केसेस करून १० लाख ९० हजार ३०० रुपये दंड वर्षभरात वसूल केला आहे.
राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १७०७ वाहतूक उल्लंघनाच्या कारवाईमध्ये पोलीस प्रशासनाकडून ६५४ कारवाया विना नंबर प्लेट कारवाया केल्या असून वर्षभरात १० लाख ९० हजार ३०० रुपये दंड पोलीस प्रशासनाकडून हा वसूल करण्यात आला आहे.
तर राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सन २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये चोरी गेलेल्या वाहनांची संख्या ही ४५ ने घटली असून चोरी गेलेल्या ५६ मोटरसायकल ह्या राहुरी पोलिसांनी जप्त केल्यात राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा मोटार सायकल ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरले जातात अशी माहिती राहुरी पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर त्यांनी आज देखील विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. तर आज पोलीस प्रशासनाकडून ५३ दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आठवण आली त्यांच्यावर २८ हजार ५०० रुपये इतका दंडात्मक कारवाई करण्यात आली.
त्यापैकी ४३ दुचाकी गाड्या मूळ मालकाच्या ताब्यात परत देऊन नंबर प्लेट बसवून देण्यात आल्या तर उर्वरित नऊ गाड्यांचे कागदपत्रे न मिळाल्याने सदर गाड्यांची मालकी हक्काबाबत खात्री करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहेत.
तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यावेळी सांगितले की आपल्या दुचाकी चार चाकी वाहनांवर पुढील व व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोधणे सोपे होईल असे आवाहन संजय ठेंगे यांनी केले आहे .
तर आज पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, स.फै. फुलारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल गीते, फुल माळी, जालिंदर धायगुडे,होमगार्ड कर्मचारी यांच्या पथकाने केलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत