डॉ. राधेश डांगे यांची एम.एस. ऑर्थोपेडिक्स अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ. राधेश डांगे यांची एम.एस. ऑर्थोपेडिक्स अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात निवड

राहाता(वेबटीम)  राहाता येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक स्व. इंद्रभान डांगे यांचे पुतणे डॉ. राधेश डांगे यांची सोलापूर येथील ऑर्...

राहाता(वेबटीम)



 राहाता येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक स्व. इंद्रभान डांगे यांचे पुतणे डॉ. राधेश डांगे यांची सोलापूर येथील ऑर्थोपेडिक्समध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल प्रीतिसुधाजी स्कूलच्या अध्यक्षा स्नेहलता डांगे, उपाध्यक्ष शशीकांतराव डांगे, शिवाजीराव डांगे,भगवानराव डांगे, माजी पोलीस अधिकारी मेघश्याम डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

राहाता तालुक्यातील दहेगाव देवीचे येथील डांगे कुटुंबातील डॉ. राधेश डांगे हे सर्वात कनिष्ठ सदस्य आहेत. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी पोलीस अधिकारी मेघश्यामजी डांगे व मंगल ताई डांगे यांचे ते चिरंजीव असून ९६ टक्के गुण मिळवून ते अंबरनाथ येथून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर १२ वी व एम.बी.बी.एस.चे शिक्षण त्यांनी धुळे येथे शासकीय महाविद्यालयातून पूर्ण केले आहे.


वैद्यकीय पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही दिवस राहाता येथे तर काही दिवस शिर्डी येथील श्री. साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहिले आहे. 


सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. राधेश डांगे यांची वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाच्या संचालिका पूनम डांगे, शिवाजी देवढे, डॉ.पांडुरंग गुंजाळ, डॉ. मधुकर देशमुख, डॉ.गोकुळ घोगरे, राहाता प्रेस क्लब, रोटरी क्लब ऑफ शिर्डी राहाताचे सर्व सदस्य, दहेगाव व पंचक्रोशीतील तसेच प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलातील स्टाफ, बालक व पालक यांनीही अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत