महाशिवरात्री निमित्त राहुरी शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा परिसरातील भावीकांनी लाभ घ्यावा- ओंकार कासार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महाशिवरात्री निमित्त राहुरी शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा परिसरातील भावीकांनी लाभ घ्यावा- ओंकार कासार

  राहुरी/वेबटीम:- २६ फेब्रुवारी रोजी असलेल्या महाशिवरात्री निमित्त राहुरी शहरातील वैजिनाथ मित्र मंडळाची उत्सव समिती स्थापन करण्यात आली. तसेच...

 राहुरी/वेबटीम:-


२६ फेब्रुवारी रोजी असलेल्या महाशिवरात्री निमित्त राहुरी शहरातील वैजिनाथ मित्र मंडळाची उत्सव समिती स्थापन करण्यात आली. तसेच मंडळाच्या वतीने चार दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 


बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री असल्याने राहुरी शहरातील जंगम गल्ली येथील वैजिनाथ मंदिरात काल दि. ८ फेब्रुवारी रोजी वैजिनाथ मित्र मंडळातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत उत्सव समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. 



यामध्ये महाशिवरात्री उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अवि ठोकळे, उपाध्यक्ष पदी विनय कोरडे व रोनक सुराणा, कार्याध्यक्ष आकाश गुलदगड, खजिनदार तेजस लुक्कड व निरज चौहान, सचिव सूरज घाडगे व सिंधू दुधाडे आदिंच्या निवडी करण्यात आल्या. 


यावेळी अनिल कासार, सुनील निमसे, अशोक स्वामी जंगम, किशोर रोडे, सचिन राऊत, किरण तोडमल, गणेश ढोले, रोहन बुरुडे, अथर्व कोरडे, स्वप्नील भालेकर, ऋषी बोरुडे, गोविंद ढिवाळकर, अक्षय सदाफळ, रोहित बुरुडे, अथर्व कोरडे, सुरज घाडगे, राज तानपुरे, सिंधु चौहान, श्रीकांत घाडगे, अमोल रणशिंग, सौरभ दुधाडे, सचिन बुरुडे, प्रणव मुथोडे, राजू गुलदगड, सुजल नगरकर, अनिकेत शिंदे, सिंधु दुधाडे, प्रथम जंगम, भाविन सुरणा, गिरीश अर्ग्रवाल, सौरभ उंडे, सचिन ढवळे, सागर तातार, भाऊ करपे, रोहित परदेशी, स्वराज शहाणे, लखन राऊत, बापू ढोले आदी उपस्थित होते.



महाशिवरात्री निमित्त जंगम गल्ली येथील वैजिनाथ मंदिरात सोमवार दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी उत्सवाचे ध्वजारोहण करण्यात येईल. मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी मंदिरा समोर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आकाश शिंदे यांचा नाथभक्ती गीतांचा भव्य कार्यक्रम पार पडणार. तसेच मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११ वा. सामूहिक ॐ नमः शिवाय या मंत्राचा सवा लक्ष जप होणार आहे.


बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ महाशिवरात्री च्या दिवशी पहाटे ४ वाजता रुद्र अभिषेक होणार. सकाळी महाआरती व होम हवन होईल. सकाळी ९ वा. आरती व प्रसाद वाटप होणार. संध्याकाळी ६.३० वा. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमूख विश्वस्त गुरूवर्य योगी नाथ निरंजन नाथ यांच्या हस्ते महाआरती व आरती नंतर शिव महिमा व नाथ भक्ती या विषयावर मार्ग दर्शन होणार आहे. रात्री ९ वा. शोभेची फटाकेची आतिषबाजी कार्यक्रम होणार आहे.


२६ फेब्रुवारी २०२५ रात्री ११ ते १.३० पर्यंत अखंड जल अभिषेक करण्यात येणार. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता कालाचे कीर्तन व १२.३० वा. भव्य भंडारा व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.


वैजिनाथ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित चार दिवस चालणाऱ्या या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा परिसरातील सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष ओंकार कासार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी सभासद व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत