राहाता (वेबटीम) राहाता शहरात वाहतुकीचे नियम न पाळणारे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे, अस्तव्यस्त गाडी लावणारे, फॅन्सी नंबर असलेल्या वाहनांना...
राहाता (वेबटीम)
राहाता शहरात वाहतुकीचे नियम न पाळणारे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे, अस्तव्यस्त गाडी लावणारे, फॅन्सी नंबर असलेल्या वाहनांना दंड राहाता पोलिस विभागाच्या वतीने पोलिस निरीक्षक नितीन जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री पेटारे यांनी शहरातील चौकात वाहन चालकांची तपासणी मोहीम हाती घेतली. यामध्ये विना क्रमांक, विना कागदपत्रे एकूण ३८ वाहने ताब्यात घेतली. विनापरवाना यासह नियम मोडणाऱ्यांकडून वाहन चालकांकडून २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी सांय ४ ते ७:०० वाजेपर्यत पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. पेटारे, हेड कॉन्स्टेबल श्री. गंभीरे, श्री अनारसे, पोलिस कॉन्स्टेबल श्री.गवांदे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह होमगार्डचे जवान यांच्या साथीने शहरातील .. चौकात वाहन चालकांसाठी ही मोहीम राबवली.यापैकी ४१ वाहनांच्या कागदपत्रांची शहानिशा आणि खात्री करून सोडण्यात आली,तर उर्वरित वाहनांच्या कागदपत्रांची शहानिशा पूर्ण होईपर्यंत ही वाहने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली.अचानक सुरू केलेल्या नाकाबंदी मोहिमेमुळे अनेक वाहनचालकांनी आपला मोर्चा इतर मार्गाने वळविला. मात्र, या मोहिमेचे सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले. शहरात अल्पवयीन मुले दुचाकी आणि चारचाकी वाहने चालविताना निदर्शनास येतात. त्यावरही कारवाईची मागणी होत आहे.
पोलिसांनी शहरातील वाहन तपासणी मोहिमेदरम्यान वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला. वाहनांची कागदपत्रे सोबत बाळगण्याचेही पोलिसांनी यावेळी चालकांना आवाहन केले. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्म पाटील, शिर्डी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने यांचा मागदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
टारगट युवकांवर कारवाई करा
शाळा - विद्यालयीन परिसरात अनेक तरुण विनाकारण शाळा भरताना व सुटताना भरथाव वेगाने दुचाकी चालवतात.विद्यार्थिनींच्या पुढे - मागे वाहन चालविणे, काही ठिकाणी वाहने आडवी लावून जमावाने उभे राहणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे. मोठ्या आवाजातील सायलेंसर लावणे असे प्रकार घडत आहेत. याकडेही पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी शिक्षक, पालक आणि सामजिक कार्यकर्ते कडून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत