देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)- राज्यात शेतकऱ्यांने बहुकष्टातून पिकविलेल्या कोणत्याच शेत मालाला हमीभाव मिळत नाही. आज रोजी शेतकरी बेसुमार कर्जबा...
देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)-
राज्यात शेतकऱ्यांने बहुकष्टातून पिकविलेल्या कोणत्याच शेत मालाला हमीभाव मिळत नाही. आज रोजी शेतकरी बेसुमार कर्जबाजारी झाल्याने मेटाकुटीस आला आहें. शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे. यासाठी पुणे येथे महसूल आयुक्तालया समोर आयोजित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला राहुरी तालुक्यातील बहुसंख्येने शेतकरी सामील होऊन पाठिंबा देण्यासाठी रवाना झाले अशी माहीती प्रगतशील शेतकरी कृष्णा मुसमाडे यांनी दिली आहे.
देवळाली-प्रवरा येथे हनुमान मंदिरात शेतकरी संघटना उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांचे अधीपत्याखाली बैठक झाली. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक नानासाहेब पठारे होते.
यावेळी ॲड. अजित काळे म्हणाले, शेतकरी संघटना नेते स्व. शरद जोशी स्व. बबनराव काळे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य राज्यासह संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे. शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होऊन सात बारा कोरा व्हावा या मागणीला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक गावातून शेतकरी जागृत झाला आहे. राज्यकर्ते फक्त वेळोवेळी दिशाभूल करून सामाजिक प्रश्नाची प्रत्यक्षात सोडवणूक न करता घोषणाबाजी करण्यातच पुढाकार घेतात. महाराष्ट्रातील छोटा-मोठ्या शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था प्रशासनाच्या गलथान कारभाराने पूर्णतः मेटाकुटीस आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक दरम्यान सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे जाहिररीत्या सांगितल्याची आठवण आज पुणे येथे आयुक्ताला करून देऊ, दिवसभर आंदोलन करून घेराव घालणार आहोत. आजचे शेतकऱ्यांचे आंदोलन यशस्वी करू असेहि ॲड. काळे शेवटी म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे ॲड. सर्जेराव घोडे राजेंद्र लांडगे ,नानासाहेब कदम आदींनी मनोगत व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत