राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दावल मलिक बाबा यात्रेस आज २० मार्च ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दावल मलिक बाबा यात्रेस आज २० मार्च ते २२ मार्च २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा उत्सवानिमित्त सरपंच सुधिर झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन यात्रा कमिटीने केले आहे.
यात्रा कमिटी कार्याध्यक्षपदी जयराम गीते अध्यक्षपदी कचरू नालकर , उपाध्यक्ष नंदू साळवे, खजिनदार शब्बीर पठाण, सचिव विजय शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
आज रात्री संदल मिरवणूक व कावड गंगाजल मिरवणूक सोहळा पार पडणार आहे. शुक्रवार २१ रोजी रात्री ८ ते ९ भव्य छबिना मिरवणूक वाद्यांसग व फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे.रात्री ९ वा . सौ दीपाली पाटीलसह बाळासाहेब बेल्हेकर यांचा लोकनाट्य तमाशा पार पडणार आहे. शनिवार २२ रोजी सकाळी हजऱ्यांचा कार्यक्रम तर दुपारी २ वा.भव्य घोडाबैल टांगा शर्यती रंगणार आहे.
तरी यात्रेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चिंचविहिरे यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत