मानोरी(सोमनाथ वाघ) राहुरी तालुक्यातील मानोरी येथे सदरुद्दीन बाबा दर्गा व रामनवमी उत्सव ३ ते ६ एप्रिल या कालावधीत संपन्न होणार असून यात्रा कम...
मानोरी(सोमनाथ वाघ)
राहुरी तालुक्यातील मानोरी येथे सदरुद्दीन बाबा दर्गा व रामनवमी उत्सव ३ ते ६ एप्रिल या कालावधीत संपन्न होणार असून यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी पोपटराव पोटे यांची निवड करण्यात आली आहे.
हनुमान मंदिरासमोर सभामंडपात यात्रा कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच ताराबाई वाघ होत्या.
यावेळी यात्रा कमिटी अध्यक्षपदी पोपटराव पोटे यांची सर्वमतीय निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी राजूभाई पठाण, गोकुळदास आढाव खजिनदारपदी नवनाथ थोरात, सहखजिनदार कैलास आढाव, कार्याध्यक्ष पैलवान संजय डोंगरे, सेक्रेटरीपदी अँड संजय पवार, सह सेक्रेटरीपदी पिरखाँभाई पठाण आदींची निवड करण्यात आली. प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यात्रेनिमित्त ३ एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी कावड मिरवणूक, संध्याकाळी संदल मिरवणूक,दि.४ रोजी शुक्रवारी यात्रोत्सव, दि.५ रोजी शनिवारी संध्याकाळी कुस्त्यांचा हंगामा व रात्री मनिषा सिद्धटेककर सह रेश्मा नारायणगावकर लोकनाट्य तमाशा तसेच दि.६ रोजी रविवारी रामनवमीनिमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत हरीकिर्तन, महाप्रसाद व दुपारी बैल शर्यत आदी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत