राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज यांचा ५९वा फिरता नारळी सप्ताह यावर्षी राहुरी फॅक्टरी ये...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज यांचा ५९वा फिरता नारळी सप्ताह यावर्षी राहुरी फॅक्टरी येथे शुक्रवार दिनांक १८ एप्रिल ते शुक्रवार दिनांक २५ एप्रिल या दरम्यान चालणाऱ्या या भव्य दिव्य कीर्तन सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा उद्या गुरुवार दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती ह.भ.प अर्जुन महाराज तनपुरे यांच्या शुभहस्ते व श्रीराम देवस्थान चिंचविहीरेचे श्री गुरु रामदास बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत क्लब हाऊस प्रांगण डॉ.तनपुरे कारखाना, राहुरी फॅक्टरी या ठिकाणी संपन्न होणार आहे.
तरी या सप्ताहाच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व भाविक भक्त व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री संत कवी महिपती महाराज फिरता नारायण सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत