राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- मानव अधिकार संरक्षण समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
मानव अधिकार संरक्षण समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांची तर राहुरी तालुका अध्यक्षपदी योगेश सिनारे यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्ष भगवानभाई दाठीया,प्रदेश जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या आदेशानुसार व उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी डॉ.विजय बापू पाटील, जिल्हा सहसंघटक लिंबाजी इंगावले यांच्या हस्ते हे निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल मानव अधिकार संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते आदींनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत