राहुरी/वेबटीम:- राहुरी शहरातील सोनार गल्ली येथील सामाजिक व धार्मिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या ओम साईराम ग्रुपच्या वतीने सालाबाद प्रमाणे...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी शहरातील सोनार गल्ली येथील सामाजिक व धार्मिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या ओम साईराम ग्रुपच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री साई सच्चरित पारायण सोहळा तसेच कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. हा पारायण सोहळा श्री संत नरहरी महाराज मंदिरात पार पडला.
गुढीपाडवा ते रामनवमी असे नऊ दिवस श्री साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच मराठी नववर्ष श्री साई सच्चरित ५व्या अध्यायानुसार दिवाळी साजरी करून बाबांना फराळाचा नैवेद्य दाखवला गेला. तसेच २७व्या अध्यायात विष्णू सहस्त्रनामाचे महत्त्व सांगितले आहे त्यामुळे या नावाचे पठणही घेतले गेले. तसेच ३८व्या अध्यायनुसार साईबाबा आपल्या भक्तांना प्रसाद वाटत असे त्यानुसार मंडळातील महिलांनी ५६ भोग नैवेद्याचे आयोजन केले होते. यावेळी महिला व पुरुष मिळवून २१ हून अधिकांनी या पारायण वाचनात सहभाग घेतला.
नवमीच्या दिवशी सकाळी अवतरणी का समाप्ती करण्यात आली त्यानंतर सत्यनारायण महापूजा चे आयोजन केले होते. त्यानंतर बारा वाजता श्री राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. दुपारी ह.भ.प.गोडसे महाराज यांचे काल्याचे किर्तन आयोजित केले होते. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सहाची आरती झाल्यानंतर पालखीमध्ये पादुका तसेच श्री साई सच्चरित ठेवून तसेच साईबाबांची गाणे लावून मनमोहक अशा वातावरणात राहुरी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.महिलांनी आपल्या खांद्यावर पालखी घेऊन पालखी मार्गाने मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी श्रीमती अन्नपूर्णा उदावंत,श्रीमती ज्योती लोळगे,सौ माधुरी पानसंबळ,सौ साक्षी लोळगे,कु प्राजक्ता शेटे,सौ नीता पानसंबळ,सौ शर्मिला पानसंबळ, श्री राहुल उदावंत,श्री प्रसाद उदावंत,श्री विक्रम डहाळे,श्री राजू उदावंत,श्री सोपान पानसंबळ,श्री प्रवीण पानसंबळ,श्री भास्कर पानसंबळ,श्री संतोष डहाळे,श्री रवींद्र कोरडे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत