राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील बाळासाहेब वाणी सेंट्रल सीबीएससी बोर्ड मान्यता प्राप्त शाळेमध्ये जिल्ह्यातील सर्व सर्वात प्रथ...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील बाळासाहेब वाणी सेंट्रल सीबीएससी बोर्ड मान्यता प्राप्त शाळेमध्ये जिल्ह्यातील सर्व सर्वात प्रथम रोबोटिक व ए आय लॅबचे उद्घाटन तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे साहेब व छत्रपती शाहू सीनियर कॉलेज च्या प्राचार्या स्वाती हापसे मॅडम यांच्या उपस्थित पार पडले.
बदलत्या काळानुसार मुलांना आधुनिक व उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे. शहरातील मुलांपेक्षा आपले मुले कुठे मागे पडू नये यासाठी नेहमीच बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अग्रेसर असते.
शाळेमध्ये 11 डिजिटल क्लासरूमचे उद्घाटनही करण्यात आले .
यामुळे मुलांना आधुनिक व उच्च दर्जाचे शिक्षण मुळे शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येईल .
यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी तुंबारे म्हणाले की, मुलांना रोबोटिक लॅब सारखे उच्च तंत्रज्ञान मुलांना उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले व मुलांनाही सदरील संधीचा फायदा घेऊन उच्च प्रकारचे ज्ञान उपलब्ध प्राप्त करून गावाचे तालुक्याचे आपले शाळेचे नाव मोठे करावे अशा शुभेच्छा दिल्या. तसेच शाहू कॉलेजच्या प्राचार्या हापसे यांनी देखील या उपलब्ध करून दिलेल्या याबद्दल शाळेच्या प्राचार्य व संस्थेचे आभार मानले मुलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे उच्च तंत्रज्ञान वाणी स्कूल लहान वयातच उपलब्ध करून देत आहे तसेच रोबोटिक सारखे ज्ञान ही काळाची गरज असून वाणी स्कूलने प्रथम हा प्रयोग केला त्याबद्दल त्यांनी शाळेचे आभार अभिनंदन केले.विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूम मुळे व आर्टिफिशियल रोबोटिक लॅब यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावता येतील व पुणे मुंबई सारखे शिक्षण गणेगाव सारख्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे डायरेक्टर दत्तात्रय वाणी नेहमी आगरी असतात त्यांच्याच संकल्पनेतून शाळेच्या प्राचार्य मॅडम सोनिया जोसेफ, उपप्राचार्य सागर कडू व शिक्षक वर्ग या सर्वांच्या सहकार्याने शाळेमध्ये मुलांसाठी अत्याधुनिक रोबोटिक लॅब व स्मार्ट क्लास उपलब्ध झाले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा फायदा घेऊन उच्च ज्ञान प्राप्त करावे या संकल्पनेतूनच या लॅब चे उद्घाटन करण्यात आले. रोबोटिक लॅबमुळे व आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या ल्यामुळे मुलांना आपल्या बौद्धिक कक्षा व कल्पनाशक्तीला वाव मिळणार आहे भविष्यात याच विद्यार्थ्यांमधून देशाला उच्च दर्जाचा तंत्रज्ञान व वैज्ञानिक तयार होतील यासाठी वाणी सेंट्रल स्कूल नेहमी अग्रे आहे प्रयत्नशील आहे.
सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या माजी प्राचार्या जाधव मॅडम, संस्थेचे चेअरमन आदीनाथ वाणी, सुवर्णा वाणी ,अर्चना वाणी , डॉक्टर रवींद्र वामन व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत