राहुरी(वेबटीम) बुधवार दि.२६ मार्च २०२५ रोजी राहुरी शहरात बुवासिंद बाबा तालीम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची काळे लावून विटंबना...
राहुरी(वेबटीम)
बुधवार दि.२६ मार्च २०२५ रोजी राहुरी शहरात बुवासिंद बाबा तालीम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची काळे लावून विटंबना करण्यात आली होती.सदरील घटनेतील आरोपींना अद्याप अटक करून कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच देवळाली प्रवरा येथिल १९ तरुणांवर ॲट्रॉसिटी, पोक्सो, सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. दोन्ही घटनांच्या निषेधार्थ मराठा एकीकरण समितीच्या माध्यमातून १८ पगड जाती १२ बलुतेदार समाजाला सोबत घेत राहुरी पोलिस स्टेशन वर गुरुवार दि.१० एप्रिल रोजी मोर्चा काढला जाणार असल्याचे पोलिस अधिक्षक राकेश ओला यांना निवेदन देवून कळविण्यात आले.
या प्रसंगी मराठा एकीकरण समितीचे राजूभाऊ शेटे,देवेंद्र लांबे, सत्यजित कदम,सचिन म्हसे, सतिष घुले,प्रकाश संसारे,शहाजी कदम उपस्थित होते.
यावेळी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे , देवळाली प्रवरा ता.राहुरी येथे बुधवार दि २६ मार्च २०२५ रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून वाद घालू दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात होता.सदरील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणून वाद मिटविण्याचा उद्देशाने देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे गेले असता काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून जीवघेणा हल्ला केला होता . दि.३० मार्च २५ रोजी राहुरी पोलीस स्टेशन मध्ये सत्यजित कदम यांनी फिर्याद दिली आहे .
परंतु आरोपींच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल केलेचा राग मनात धरून दि.४ मार्च २५ रोजी राहुरी पोलीस स्टेशन मध्ये देवळाली प्रवरा येथील १९ जणांवर पोक्सो, ॲट्रॉसिटी, विनयभंग अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. सर्व नागरिकांना व पोलिसांना ही माहित आहे की अशा प्रकारचे गुन्हे घडलेले नाहीत. परंतु तरीही पोलिसांनी कोणाच्या दबावात किंवा कशाच्या आधारे हे गुन्हे दाखल केले आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ज्या लोकांच्या विरोधात सत्यजित कदम पाटील यांनी फिर्याद दिली आहे, त्या लोकांच्या बाबतीत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. अवैध व्यवसाय, चोऱ्या, छेडछाड, शेतमाल व चारा चोरी करणे व जबरी मारहाण करून जखमी करणे अशा प्रकारचे कृत्य त्यांच्या हातून घडत असतात. परंतु सर्वसामान्य लोक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्यायला घाबरतात.त्यास कारण त्यांनाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जाते. अशा लोकांवर कारवाई करण्याऐवजी शहरातील १९ होतकरू सुशिक्षित तरुणांवर ज्यांनी कुठलाही गुन्हा केला नाही त्यांच्यावर मुद्दाम वैर धरून वेगवेगळे खोटे आरोप करून गुन्हे दाखल केले आहेत. माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचेवर खुनी हल्ला होवून जवळपास अकरा दिवस पूर्ण होवूनही अद्याप आरोपी मोकाट आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक भयभीत झाले आहेत.
खोटे गुन्हे दाखल झाल्यामुळे नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणत असंतोष निर्माण झाला आहे.त्यामुळे पोलिसांनी जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत व सत्यजित कदमांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना अटक करून त्यांचेवर कडक कारवाई करावी.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या व्यक्तींची नावे जाहीर करून कारवाई करण्यात यावी व देवळाली प्रवरा येथील तरुणांवरील खोटे गुन्हे बुधवार दि. ०९.०४.२०२५ पर्यंत मागे न घेतल्यास गुरुवार दि. १० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता मराठा एकीकरण समिती १८ पगड जाती १२ बलुतेदार समाजाला सोबत घेवून राहुरी पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत