राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील गुहा येथील रमाई माता प्रतिष्ठान यांच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेड...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील गुहा येथील रमाई माता प्रतिष्ठान यांच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते यावर्षी देखील विविध कार्यक्रम राबवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे.
याप्रसंगी यंदाच्या जयंतीच्या निमित्ताने अध्यक्ष पदाची धुरा सचिन ओहोळ यांच्याकडे तर उपाध्यक्ष म्हणून किरण ओहोळ यांची निवड करण्यात आली तर खजिनदार म्हणून धनंजय ओहोळ यांची निवड करण्यात आली.
जयंतीनिमित्ताने भव्य मिरवणूक तसेच समाजप्रबोधनाचे कार्यक्रमाचे देखील आयोजन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आल्यात.
या बैठकीप्रसंगी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत