राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेल्या शांती चौक मित्र मंडळाच्यावतीने डॉ.बाबास...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेल्या शांती चौक मित्र मंडळाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज सोमवार ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान श्री साई चरित्र पारायण सोहळा व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाचे हे १६ वे वर्ष आहे.
या दरम्यान काकड आरती,साईचरित्र पारायण,मध्यान्ह आरती,हरिपाठ, धुपारती तसेच रात्री ७ ते ९ यावेळेत किर्तन व त्यानंतर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पारायणाचे व्यासपीठ चालक म्हणून श्रीनिवास सहदेव, गौरव सहदेव हे सेवा देणार आहे.
मंगळवार ८ एप्रिल रोजी बाबा महाराज मोरे, बुधवार ९ एप्रिल रोजी नामदेव महाराज जाधव(शास्त्री), गुरुवार १० एप्रिल रोजी अशोक महाराज इलग शास्त्री, शुक्रवार ११ एप्रिल रोजी दीपक महाराज देशमुख, शनिवार १२ रोजी आरतीताई महाराज मगर, रविवार १३ एप्रिल रोजी रेखाताई महाराज काकड तर सोमवार १४ एप्रिल रोजी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
या सप्ताहासाठी समाजातील विविध दानशूर मंडळी, अन्नदाते व टाळकरी , वारकरी यांचे सहकार्य लाभणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शांती चौक मित्र मंडळाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत