राहुरी(वेबटीम) राहुरी शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निलेश भाऊ जगधने मित्र मंडळ तसेच पिंटू नाना साळवे मित्र मंडळाच्या वतीने अन...
राहुरी(वेबटीम)
राहुरी शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निलेश भाऊ जगधने मित्र मंडळ तसेच पिंटू नाना साळवे मित्र मंडळाच्या वतीने अनोक्या पद्धतीने साजरी करण्यात आली14 एप्रिल रोजी राहुरी बस स्थानक या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून तसेच गो शाळेला चारा वाटप करून 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले तसेच दिनांक 20 एप्रिल रोजी राहुरी येथील मिशन शाळा या ठिकाणी अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर दिनांक 21 एप्रिल रोजी नूतन मराठी शाळा क्रमांक १तसेच नूतन कन्या शाळा व उर्दू शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले .तसेच यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली या भाषेत स्पर्धेत तीन पारितोषिक वाटप करण्यात आले .यावेळी मनोगत व्यक्त करताना निलेश जगधने यांनी सांगितले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दररोज साजरी केली तरी ती कमी आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते निलेश जगधने यांनी केले .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाय एस तनपुरे हे होते .यावेळी व्यासपीठावर निलेश जगधने , पिंटू नाना साळवे , बाळासाहेब जाधव ,सचिन साळवे , भास्कर अल्हाट , राजेंद्र आडगळे , मयूर दुधाडे , स्वप्निल कासार , पत्रकार मनोज साळवे ,अनिल कोळसे , दिपक साळवे ,व इ कार्यकते उपस्थित होते या वेळेस मुख्याध्यापक लाड सर , सौ भोजने मॅडम , शेख मॅडम यांनी कार्यक्रमांसाठी सहकार्य केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत