श्रीरामपूर : (संदिप पाळंदे) संग्रहित छायाचित्र गेल्या 40 वर्षांपासून वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून कधी सर्वपक्षीय तर कधी...
श्रीरामपूर : (संदिप पाळंदे)
संग्रहित छायाचित्र
गेल्या 40 वर्षांपासून वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून कधी सर्वपक्षीय तर कधी पुतळा स्मारक समितीच्या वतीने महाराजांचा पुतळा शिवाजी चौकात उभारण्यात यावा म्हणून अनेक आंदोलने झाली. जनतेच्या पैशातून पुतळा खरेदी करण्यात आला. अनेक वर्षांपासून त्याच्यावर दहा हजार रुपये प्रति महिना शास्ती भरली जाते आणि तीही जनतेच्या पैशातून.
नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता असताना व त्यानंतरच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनानी मंडई समोर व अन्य ठिकाणी पुतळा उभारण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही श्रीरामपूर शहरातील सर्व हिंदुत्ववादी लोकांनी पुढाकार घेऊन त्यांचा तो निर्णय हाणून पाडण्यात आला. त्यानंतर केंद्रात व राज्यात हिंदुत्ववादी पक्षाचे सत्ता आल्याने आम्ही आंदोलनाचे मार्ग न अवलंबता तत्कालीन मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा केला तेव्हा आम्हाला अनेकांनी आश्वासन दिले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच बसणार असे ठोस असे शाश्वती दिल्यानेच आम्ही एवढे दिवस शांत बसलो होतो. परंतु आत्ता स्वतःला हिंदुत्ववादी सरकार असे समजणाऱ्या सरकारच्या काळामध्ये देखील प्रशासन आता पुन्हा त्याच मंडईच्या समोरील ठिकाणीच भूमिपूजन करणार असेल तर आम्ही याचा जाहीर निषेध करतो व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृति समितीला अजिबात हा निर्णय मान्य नाही.
शहर व तालुक्यामधील इतर सर्व पुढारी काही बोलत नाही. सर्व काही एकतर्फी घडत आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने मंडईत पुतळा न बसवता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा बसवावे या निर्णयाचा आम्ही त्यांचा स्वागत करू व त्यांचा सत्कार करू मंडई समोर पुतळा बसविल्यास अन्यथा कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बाबासाहेब शिंदे, प्रवीण फरगडे, डॉ. दिलीप शिरसाठ यांनी दिला आहे. या आंदोलनात सर्व शिवप्रेमींनी सहभाग घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत