श्रीरामपूर : (संदिप पाळंदे) येथील स्व. सौ. साकरबेन करमशीभाई सोमैया प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्र या शाळेचा इयत्ता दुसरीचा विद्यार्...
श्रीरामपूर : (संदिप पाळंदे)
येथील स्व. सौ. साकरबेन करमशीभाई सोमैया प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्र या शाळेचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी प्रज्वल गणेश पिंगळे याने विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. प्रज्वलने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा १५० पैकी १४८ गुण मिळवत राज्यात द्वितीय, लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा १५० पैकी १४८ राज्यात द्वितीय, एक्सलट ऑलंपियाड राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०० पैकी १९६, भारत टॅलेंट सर्च १५० पैकी १२८ तालुक्यात प्रथम, महात्मा फुले प्रज्ञाशोध परीक्षा १५० पैकी १३६ जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळवून आपल्या बुद्धीमत्तेची चुणूक दाखवली.
प्रज्वल पिंगळे याच्या यशासाठी त्याचे वर्गशिक्षक अमोल इधाते यांचे अनमोल मार्गदर्शन व कष्ट उपसले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पैठणे, जालिंदर जाधव व इतर शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रज्वलच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे, पढेगाव केंद्रप्रमुख राजू इनामदार, शिक्षक नेते नानासाहेब बडाख, विपुल गागरे, सागर माळी, पत्रकार संदिप पाळंदे आदींनी कौतुक केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत