राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील क्लब हाऊस प्रांगणात सुरू असलेल्या संत कवी महिपती महाराज ५९ वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्तहाची ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील क्लब हाऊस प्रांगणात सुरू असलेल्या संत कवी महिपती महाराज ५९ वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्तहाची उद्या शुक्रवार २५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती वा.महंत अर्जुन महाराज तनपुरे। यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसाद पंगतीने सांगता होणार आहे.
गेल्या सात दिवसांपासून फिरता नारळी सप्ताहनिमित्ताने दररोज किर्तन व महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न होत असून भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
उन्हाचा प्रचंड तडाखा असल्याने उद्या शुक्रवार २५ एप्रिल रोजी सकाळी संपन्न होणारे काल्याचे किर्तन हे सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार असल्याचे सप्ताह कमिटीने सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत