राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्याची कामधेनु डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 31 मे रोजी होत असून याच पार्श्वभूम...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुक्याची कामधेनु डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 31 मे रोजी होत असून याच पार्श्वभूमीवर कामगार वर्गाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी कामगार यांची बैठक उद्या रविवार दिनांक २७ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता राहुरी कारखाना कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदिरात संपन्न होणार होणार आहे.
याबाबत युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या कारखाना घेण्यासाठी नेते मंडळांची शर्तीचे प्रयत्न होताना दिसत आहे. मात्र कामगारांच्या एक दशकापासून थकीत असलेल्या मोठमोठ्या रकमा देण्याबाबत ठोस निर्णय कोणी देऊ शकत नाही.वेळोवेळी फसगत झाल्यामुळे त्यांचे बाबत कामगारांमध्ये शाश्वती नाही,असे चित्र आहेत. मात्र येणाऱ्या निवडणुकीत सर्व कामगार वर्गाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असल्यान पुढील दिशा व ध्येय धोरण ठरवण्यासाठी मते जाणून घेतली जाणार आहे.
या मेळाव्यासाठी सेवेतील कायम कामगार, सेवानिवृत्त कामगार, सिझनल कामगार, संकलित कामगार, मजुर हजरी कामगार, पिसवर्क कामगार बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत