श्रीरामपूर (संदीप पाळंदे) राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या १९८ व्या व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या संयुक्त जयं...
श्रीरामपूर (संदीप पाळंदे)
राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या १९८ व्या व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या संयुक्त जयंती निमित्त महामानव विचार प्रबोधन समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. १८) श्रीरामपूर येथील आगाशे सभागृह, टिळक वाचनालय, मेन रोड येथे सायं. ०५. ०० वाजता जाहीर प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.
या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक जितेंद्र तोरणे हे करणार असून प्रमुख व्याख्याते म्हणून फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे विचारवंत इंजि. आप्पासाहेब गायकवाड व लहुजी सत्यशोधक संघटनेच्या अध्यक्षा नंदाताई लोखंडे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून शेकडो परीवर्तनवादी विचारांचे कार्यकर्ते येणार आहेत. तरी या कार्यक्रमाला बहुजन समाजातील विद्यार्थी, महिला, बुद्धीजीवी वर्गाने उपस्थित राहून तन-मन-धनाने सहकार्य करावे असे आवाहन महामानव विचार प्रबोधन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत