राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील सुमारे ४० लक्ष रुपयांच्या विविध स्थानिक विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच देवळाली प...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील सुमारे ४० लक्ष रुपयांच्या विविध स्थानिक विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच देवळाली प्रवरासह ३२ गावांसाठी आमदार जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांच्या शुभहस्ते उद्या मंगळवारी १५ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १ देवळाली दवनगाव रस्ता इनामदार वस्तीपर्यंत रस्ता खडीकरण करणे १० लक्ष रुपये त्याचबरोबर प्रभाग क्रमांक ९ मध्ये कारखाना टाकळी रस्ता ते संजय भास्कर कदम वस्तीपर्यंत रस्ता खडीकरण करणे १० लक्ष रुपये तर देवळाली प्रवरा नगरपरिषद अंतर्गत हाय मॅक्स बसवणे १० लक्ष त्याचबरोबर प्रभाग क्रमांक २ मध्ये अर्जुन मुसमाडे यांच्या वस्तीजवळ हाय मॅक्स बसवणे प्रभाग क्रमांक ४ मध्ये कुंभार गल्ली संजय पाटील यांच्या घराजवळी चौकात हाय मॅक्स बसवणे प्रभाग क्रमांक ३ मधील देवळाली शेटेवाडी रोड पासून भागवत खांदे वस्ती पर्यंतचा रस्ता खडीकरण करणे १० लक्ष तसेच देवळाली प्रवरासह ३२ गावांसाठी आमदार जनसंपर्क कार्यालय अशा विविध कार्यक्रमांचे उद्घाटन संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे असणार असून या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे,श्रीरामपूर मार्केट कमिटीचे सभापती सुधीर नवले,जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे आदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन देवळाली प्रवरा शहर काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत