राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथील हनुमान मंदिरात बाळकृष्ण महाराज खांदे यांच्या सुश्राव्य वाणीतून भावार्थ रामायण क...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथील हनुमान मंदिरात बाळकृष्ण महाराज खांदे यांच्या सुश्राव्य वाणीतून भावार्थ रामायण कथा संपन्न झाली. या कथेस भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
गेल्या ५ वर्षांपासून प्रसादनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात येते. यंदा भावार्थ रामायण कथा पार पडली.यानिमित्ताने प्रसंगनारूप जिवंत देखावे सादर करण्यात आले. पोपट महाराज वांबोरीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.
प्रसादनगर येथे १०८ हनुमान चालीसा पठण सोहळा पार पडला होता.त्यास मोठा प्रतिसाद मिळाला होता. या ठिकाणी दररोज हरिपाठ केला जातो तसेच अडीच वर्षांपासून दर शनिवारी हनुमान चालीसा पठण होते. दोनशे भाविक उपस्थित असतात त्यानंतर खिचडी प्रसाद अन्नदात्यांचकडून दिला जातो.
हरिपाठ व हनुमान चालीसाची दखल घेऊन श्री.गजानन महाराज संस्थातर्फे मंदिरात टाळ पखवाज देण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत